हरित ऊर्जेच्या दिशेने

नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र

views

4:39
नैसर्गिक वायूच्या ज्वलनामुळे उच्च तापमान व दाब निर्माण होतो. या उच्च तापमानामुळे व दाबामुळे जो वायू निर्माण होतो त्या वायूने टर्बाइन फिरवून विद्युत निर्मिती करण्यात येते. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रामध्ये रचना असते. आता आपण यात ऊर्जेचे रूपांतरण कसे होते ते पाहू. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे विद्युत संचाचे तीन भाग असतात. कॉम्प्रेसरच्या मदतीने ज्वलन कप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. त्याठिकाणी नैसर्गिक वायू एकत्र येऊन त्याचे ज्वलन केले जाते. त्यानंतर या कप्यातून येणारा अति उच्च दाबाचा व तापमानाचा वायू टर्बाइनची पाती फिरवतो. टर्बाइनला जोडलेले जनित्र फिरते व विद्युत निर्मिती होते. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्या-टप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतर या आकृतीत दिले आहे. यानुसार नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने गतिज ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे टर्बाइनमध्ये गतिज ऊर्जा निर्माण होऊन विद्युत ऊर्जा निर्मिती होते.