हरित ऊर्जेच्या दिशेने

सौर विद्युत घट (Solar Photovoltaic cell)

views

5:33
सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करण्याच्या प्रक्रियेला 'फोटो व्होल्टाइक परिणाम' असे म्हणतात. ही प्रक्रिया सौर विद्युत घटामध्ये घडवून आणली जाते. ही विद्युत शक्ती दिष्ट (DC) रूपात उपलब्ध होत असते. हे सौर विद्युतघट सिलिकॉनसारख्या अर्धवाहक पदार्थापासून बनलेले असतात. उदा. सिलिकॉनच्या 1 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून 30mA मिलीअॅम्पिअर एवढी विद्युतधारा आणि 0.5v० इतके विभवांतर मिळते. तर 100 cm2 क्षेत्रफळाच्या सिलिकॉनच्या एका सौर घटापासून जवळपास 3A(अॅम्पिअर) म्हणजेच 30mA / cm2 (मिलीअॅम्पिअर पर सेंटीमीटर वर्ग) x 100 cm2 = 3000mA (मिलीअॅम्पिअर) = 3A(अॅम्पिअर) इतकी विद्युतधारा व 0.5 v एवढे विभवांतर मिळते. या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की, सौर घटापासून मिळणारे विभवांतर हे त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून नसते.