हरित ऊर्जेच्या दिशेने

सौर औष्णिक विद्युत केंद्र (solar Thermal)

views

2:20
कोळसा, अणु ऊर्जा यांच्याद्वारे औष्णिक ऊर्जा मिळवून त्याद्वारे विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. म्हणजेच विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी सूर्यप्रकाशापासून औष्णिक ऊर्जा वापरता येते. सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तकाचा वापर करतात. त्यानंतर सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषकाद्वारे शोषून घेतली जाते. त्यानंतर वाफेवर चालणाऱ्या टर्बाइनच्या मदतीने व विद्युत जनित्रांच्या मदतीने विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. विद्युत निर्माण करण्यासाठी सूर्यकिरण परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरले जातात व त्याद्वारे सूर्यकिरण मनोऱ्यावरील एका शोषकावर केंद्रित केले जातात. त्यामुळे तिथे उष्णता ऊर्जा तयार होते. या उष्णतेच्या मदतीने पाण्याचे रूपांतर वाफेत केले जाते व टर्बाइन आणि जनित्र फिरवले जाऊन विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. अशाप्रकारे सौर ऊर्जेच्या साहाय्याने औष्णिक विद्युत तयार केली जाते. विद्युत ऊर्जा ही आज सर्वच ठिकाणी उपयोगात आणली जाते. औद्योगिक क्षेत्र, घरगुती वापर, वैद्यकीय क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात विद्युत ऊर्जा उपयोगी पडत आहे.