पेशी रचना व सूक्ष्मजीव

पेशींचे प्रकार

views

4:19
पेशींचे वनस्पती पेशी व प्राणी पेशी असे दोन प्रकार असतात. आपण या दोघांचीही सविस्तर माहिती घेऊ. वनस्पती पेशी: वनस्पती पेशींच्या सर्वात बाहेर सेल्युलोजने बनलेली पेशीभित्तिका असते. त्यामुळे त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो. पेशीपटल पेशीभितिकेच्या आत असते, आणि त्याच्या आत पेशीद्रव्य आणि काही पेशी अंगके असतात. लवक हे पेशी अंगक केवळ वनस्पती पेशींमध्ये असते. आणि हरितलवक हे अंगक प्रकाश संश्लेषण करते. केंद्रक, आंतर्द्रव्यजालिका, गॉल्जीपिंड, तंतुकणिका ही अंगके पेशीद्रवात पसरलेली असतात. वनस्पती पेशींमध्ये मोठ्या आकारांच्या रिक्तिका आढळतात. या सर्व दृश्यकेंद्रकी पेशी असतात. प्राणी पेशी: प्राणी पेशीच्या सर्वात बाहेर पेशीपटल असते. पेशीपटलाच्या आत पेशीद्रव असतो आणि हा सर्व बाजूने पसरलेला असतो. प्राणी पेशींमध्ये केंद्रक, आंतर्द्रव्यजालिका, तंतुकणिका, लयकारिका, गॉल्जीपिंड आणि काही छोट्या छोट्या आकाराच्या रिक्तिका असतात. प्राणी पेशींमध्ये लवक हे अंग नसते. त्यामुळे हे प्रकाश संश्लेषण करून अन्ननिर्मिती करू शकत नाही. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांमध्ये पेशीभित्तिका, पेशीपटल, पेशीद्रव, पेशी अंगके हे घटक असतात.