पेशी रचना व सूक्ष्मजीव

सूक्ष्मजीवांचे स्वरूप

views

4:44
आपल्या पृथ्वीवर असंख्य सजीव आहेत. त्यापैकी आपल्याला जे सहजासहजी डोळ्यांना दिसत नाहीत आणि ज्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो, त्यांना सूक्ष्मजीव असे म्हणतात. काही सूक्ष्मजीव हे एकपेशीय तर काही बहुपेशीय असतात. पावावर येणारी बुरशी, डबक्यातील शेवाळाचे तंतू हे बहुपेशीय सूक्ष्मजीव आहेत. तर जीवाणू आणि विषाणू यांसारखे सूक्ष्मजीव हे एकपेशीय आहेत. या सूक्ष्मजीवांच्या पेशींची रचना थोडीशी भिन्न असते. या पेशींमध्ये दृश्यकेंद्रकी पेशीत आढळणारी पटलापासून तयार झालेली अंगके आढळत नाहीत. तर या पेशींमध्ये फक्त प्रद्रव्यपटल, पेशीद्रव्य व केंद्रकद्रव्य एवढेच घटक आढळतात. म्हणूनच यांना आदिकेंद्रकी पेशी असे म्हणतात. यामध्ये संपुटिका, पेशीपटल, प्रद्रव्यपटल, केंद्रकाभ, पेशीद्रव्य, रायबोझोम, प्लाझमिड, कशाभिका हे घटक दिसत आहेत.