पेशी रचना व सूक्ष्मजीव

ओला कचरा आणि सुका कचरा

views

4:45
ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा का जमा करावा? यासंदर्भात जाणून घेवू. सूक्ष्मजीवांमुळे मनुष्याला अनेक रोग होतातच, पण सूक्ष्मजीवांमुळे केवळ मानवालाच नाही तर वनस्पती आणि प्राणी यांनाही रोग होतात. प्राण्यांना रेबीज, बर्डफ्ल्यू, असे रोग होतात. तसेच जनावरांनाही ताप येतो, तसेच तोंड खुरी, पाय खुरी इत्यादी रोग होतात. तोंडखुरी रोग झाल्यानंतर प्राण्यांना खाता येत नाही. आणि पायखुरी रोग झाल्यावर त्यांना चालता येत नाही. वनस्पती, प्राणी, मानव किंवा कोणताही सजीव असो त्यांना रोग होतात. उपद्रवी सूक्ष्मजीव अन्न खराब करतात. परंतु आपल्या सभोवताली जर स्वच्छता ठेवली तर या रोगांना ब-याच प्रमाणात आळा घालता येईल. सुमारे 80% आजार हे अस्वच्छतेमुळे होतात. काही आजार तर संसर्गजन्य आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर आजार झाला तर वेगाने त्या रोगाचा प्रसार होतो. असे होऊ नये म्हणून आपल्या आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका ठेवावा, कोठेही कचरा टाकू नये किंवा कचरा साठूही देऊ नये, उघड्यावर शौचास बसू नये. आपल्या वैयक्तिक स्वछ्तेबरोबर सार्वजनिक स्वछतेबाबतीत आपल्याला जागरूक राहणे गरजेचे आहे. स्वच्छतेला महत्त्व केवळ आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगभरात दिले जाते. आपल्या देशातील स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी म्हणून भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान राबविले आहे. आपण सुद्धा आपल्या शाळेत, परिसरात स्वच्छतेचे उपक्रम राबवायला पाहिजे. ज्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला स्वच्छतेविषयी जाणीव निर्माण होईल.