भौतिक राशींचे मापन

अदिश राशी व सदिश राशी

views

2:2
अदिश राशी ( Scalar Quantity) : केवळ परिमाणाच्या साहाय्याने म्हणजेच मूल्य व एकक यांच्या साहाय्याने व्यक्त होणाऱ्या राशीला अदिश राशी असे म्हणतात. या राशी व्यक्त करण्यासाठी दिशेची आवश्यता नसते. उदा. लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा वापर होतो. सदिश राशी (Vector quantity) : परिमाण व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय. म्हणजेच ही राशी व्यक्त करण्यासाठी मूल्य व एककासोबत दिशाही दर्शविली जाते. विस्थापन, वेग या सदिश राशी आहेत. उदा. उत्तर दिशेस 20 किलोमीटर विस्थापन व पूर्व दिशेस 20 किलोमीटर विस्थापन यांत फरक आहे. येथे अंतर समान आहे, पण विस्थापनाची दिशा वेगळी आहे.