भौतिक राशींचे मापन

मापनाचा इतिहास

views

4:36
मानवाला पहिल्यांदा जेव्हा मापनाची गरज भासू लागली तेव्हा त्याने स्वत:च्या शरीराच्या भागांचा वापर करणे सुरू केले. प्राचीन काळात इजिप्तमध्ये माणसाच्या कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या अंतरास ‘क्युबिट’ असे म्हणत. आणि प्रत्येक व्यक्तीनुसार हे माप वेगवेगळे असे. म्हणून राजाचे ‘क्युबिट’ हे प्रमाण मानले जाई. तसेच पूर्वी आपल्याकडे ‘गुंज’ या मापाने सोने तोलत असत. शिवाय कालमापनासाठी वाळूचे घड्याळ वापरले जात असे. इंग्लंडमध्ये लांबी मोजण्यासाठी पावलाचा वापर करीत. म्हणून लांबीचे एकक ‘foot’ हे झाले.