भौतिक राशींचे मापन

वस्तुमान (Mass) आणि वजन

views

4:04
एखाद्या पदार्थाचे वस्तुमान, म्हणजे त्या पदार्थामध्ये सामावलेला एकूण द्रव्यसंचय होय. पदार्थात निसर्गात: जडत्व असते. जडत्व म्हणजेच पदार्थात नैसर्गिकपणे स्थितीबदलास विरोध करण्याची प्रवृत्ती असते. पदार्थाचे वस्तुमान जितके जास्त असते तितकेच त्या पदार्थाचे जडत्वही जास्त असते. म्हणूनच वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. वस्तू कितीही सूक्ष्म असली, तरी त्या वस्तूला काहीतरी वस्तुमान हे असतेच. वस्तुमानच नाही अशी कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही. पदार्थाचे वस्तुमान हे नेहमी आहे तेच निश्चित राहते. त्यात कोणताही बदलत होत नाही. वस्तुमान ही एक अदिश भौतिक राशी आहे. वस्तुमानाचे एकक किलोग्रॅम व ग्रॅम आहे. पदार्थाचे वस्तुमान व पदार्थाचे वजन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या पदार्थाचे वजन म्हणजे तो पदार्थ ज्या गुरुत्वीय क्षेत्रात असेल, त्या गुरुत्वीय क्षेत्राने पदार्थावर लावलेले गुरुत्वाकर्षण बल होय. म्हणजेच एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वजन म्हणतात. वजन ही सदिश राशी आहे.