अंतर्गत हालचाली

वली पर्वत

views

5:10
पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जालहरींमुळे मृदू म्हणजे मऊ खडकांच्या थरावर क्षितीजसमांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. म्हणजेच घड्या निर्माण होतात. दाब तीव्र झाल्यास म्हणजेच दाब प्रचंड प्रमाणात निर्माण झाल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात. त्यांची गुंतागुत वाढते. त्यामुळे जमिनीचा वरचा भाग वर उचलला जाऊन वली पर्वतांची निर्मिती होते. हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत.