अंतर्गत हालचाली

ज्वालामुखीचे परिणाम

views

2:18
आपण ज्वालामुखीचे काय परिणाम होतात ते पाहू. १) ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होते. २) भूकंपामुळे जशा त्सुनामी लाटा निर्माण होतात, तशाच त्सुनामी लाटा महासागरातील ज्वालामुखींमुळे होतात. त्यामुळेसुद्धा जीवित व वित्तहानी होते. ३) ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूळ, धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक जास्त काळ वातावरणात राहतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. ४) ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या राखेमुळे जमीन सुपीक बनते. ५) लाव्हारसामुळे भूपृष्ठाअंतर्गत असलेली अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. ६) ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते. ७) मृत ज्वालामुखींच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात.