अंतर्गत हालचाली

नकाशाशी मैत्री

views

3:00
नकाशा पहा आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.१) नकाशातील भूपट्ट सीमांचे नीट निरीक्षण करून नकाशातील भूपट्टांची नावे सांगा?-भूपट्टांची नावे आहेत: पॅसिफिक, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरेशिया, आफ्रिका, अंटार्तिका भारत- ऑस्ट्रेलिया भूपट्ट.आणि इतर भूपट्टाची नावे आहेत: कॅरीबियन, कोकोस, नाझका, स्कोशिया, सोमाली, अरेबिया भूपट्ट इत्यादी.२) दक्षिण व उत्तर अमेरिकेत भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या कोणत्या बाजूला आहे? तेथे कोणते पर्वतीय प्रदेश आहेत?-भूकंपाचे क्षेत्र पश्चिम बाजूला आहे. उत्तर अमेरिकेत भूकंपाच्या क्षेत्राजवळ पॅसिफिक पर्वतीय प्रदेश आणि दक्षिण अमेरिकेत भूकंपाच्या क्षेत्राजवळ अँडीज पर्वतीय प्रदेश आहे. भूपट्ट सीमांचा भूकंपक्षेत्र व ज्वालामुखीक्षेत्र यांच्याशी थेट संबंध आहे. बहुतेक ज्वालामुखी हे या सीमांवर आहेत. त्याचप्रमाणे भूकंप क्षेत्राचा विस्तारही या सीमावर्ती भागात दिसून येतो. भूपट्ट सीमांच्या ज्या भागात, भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो, त्याठिकाणी भूपट्ट ऱ्हास पावत असतो. म्हणजे भूपट्ट नष्ट होतो. अशा सीमांना भूपट्ट ऱ्हास सीमा असे म्हणतात. ज्या सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकाराला येतात, अशा सीमांना भूपृष्ठ निर्मिती सीमा असे म्हणतात.