अंतर्गत हालचाली

खंडनिर्माणकारी हालचाली

views

4:29
मंद भू-हालचालींमुळे पर्वतांच्या विवध प्रकारांची निर्मिती कशी होते हे आपण पाहिले. आता आपण मंद भू-हालचालींमुळे भू-खंडाची निर्मिती कशी होते हे पाहणार आहोत. मंद भू-हालचाली ऊर्ध्वगामी व अधोगामी दिशेने होतात. म्हणजेच पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. या हालचालींमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग म्हणजेच जमिनीचा खूप मोठा भाग वर उचलला जातो, किंवा खाली खचतो. असा भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते. म्हणून या भू-हालचाली खंडनिर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. अशा हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांचीही निर्मिती होऊ शकते. हे झाले भूभाग वर उचलला तर, परंतु मुळचा भाग खाली खचल्यास तो भाग समुद्रसपाटीच्या खाली जातो. अशा वेळी तो भू-भाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागरतळाचा भाग बनतो.