अंतर्गत हालचाली

भूकंपनाभी व अपिकेंद्र

views

4:25
भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो साचत जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते. म्हणजेच ऊर्जा विविध दिशेने बाहेर पडते. तेथे भूकंप केंद्र असते. या केंद्रास भूकंपनाभी असे म्हणतात या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जालहरी पसरतात. या लहरी भूकंपनाभीपासून म्हणजे भूकंप केंद्रापासून भूपृष्ठावर जेथे सर्वात प्रथम पोहचतात, तेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो. भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र असे म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंपनाभीशी लंबरूप असते. भूकवचातील साचलेली ऊर्जा ज्याठिकाणी मोकळी होते त्याला भूकंपनाभी असे म्हणतात. भूकंपनाभीपासून ऊर्जा लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वप्रथम पोहोचतात, त्याला अपिकेंद्र असे म्हणतात. भूकंपनाभीकडून म्हणजेच भूकंप केंद्राकडून ताण मुक्त झाल्यावर, मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशांनी होते. ही ऊर्जा विविध लहरींच्या रूपात भूपृष्ठाकडे येते. भूकंप लहरींचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी असे तीन प्रकार पडतात.