अंतर्गत हालचाली

भूकंपमापन यंत्र

views

4:05
भूकंप लहरींची नोंदणी भूकंपमापन यंत्रावर होते ते यंत्र सीस्मोग्राफ म्हणून ओळखले जाते. या यंत्राद्वारे भूकंप लहरींचा आलेख काढता येतो. या आलेखाचा अभ्यास करून भूकंपाची तीव्रता कळते. या आकृतीत भूकंपमापन यंत्र व त्यावर होणारा आलेख दाखविलेला आहे. भूकंप तरंगाची किंवा लहरींची तीव्रता मोजण्याचे प्रमाण डॉ.चार्लर रिश्टर यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याठिकाणी शोधले. यामुळे रिश्टर यांच्या नावावरूनच भूकंप तीव्रता ही रिश्टर स्केलमध्ये मोजली जाते. अलीकडील नवीन तंत्राच्या साहाय्याने आधुनिक भूकंपमापन यंत्रे तयार करण्यात आली आहेत. ज्यांच्याद्वारे अतिसूक्ष्म लहरीदेखील मोजता येतात. आपल्याला भूकंप लहरींचे स्वरूप कसे असते ते समजावे म्हणून आपण काही प्रयोग करणार आहोत.