संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध

रोगांचा प्रसार

views

2:49
मुलांनो, रोगांचा प्रसार अनेक पद्धतीने होत असतो. उदाहरणार्थ हवेमार्फत, पाण्यामार्फत, अन्नपदार्थांमार्फत, कीटकांमार्फत, संपर्कामुळे. तर मग आता आपण त्यांची माहिती करून घेऊ. 1) हवेमार्फत रोगप्रसार: फ्ल्यूसारख्या रोगाचे जंतू रोगी व्यक्तीच्या थुंकीत असतात. फ्ल्यू झालेली व्यक्ती थुंकल्याने, खोकल्याने किंवा शिंकल्याने तिच्यातील रोगजंतू हवेत मिसळतात. उदा: क्षय, स्वाईन फ्ल्यू इ. रोग हवेत पसरलेल्या रोगजंतूंमुळेच होत असतात. म्हणून मुलांनो, आपण नेहमी शिंकताना, खोकताना नाकावर व तोंडावर रुमाल धरावा. सार्वजनिक ठिकाणी असताना तर या गोष्टींचा अवलंब करणे खूप गरजेचे असते. म्हणून आपण शाळेत किंवा बाहेर इतर ठिकाणी जाताना आपल्यासोबत नेहमी रुमाल ठेवावा. 2) पाण्यामार्फत रोगप्रसार: सांगा पाहू! मुलांनो, समोर तुम्हांला जे चित्र दिसते आहे. त्या चित्रात कोणकोणती कामे चालू असलेली दिसत आहेत? सांगा पाहू. मुलांनो ह्या पाणवठ्यावर जी विविध कामे चालू आहेत ती अत्यंत चुकीची आहेत. कारण टायफॉईड, कॉलरा, जुलाब यांसारख्या आतड्यांच्या रोगांचे जंतू तसेच काविळीचे जंतू रोग्याच्या विष्ठेमध्ये असतात. ही विष्ठा पाण्यात मिसळली, की हे रोगजंतूही पाण्यात शिरतात. असे पाणी पिणाऱ्या लोकांना या रोगाची लागण होते. म्हणून असे रोग आपल्याला होऊ द्यायचे नसतील तर पाणवठ्यावर अंघोळ करणे, कपडे धुणे, नदीकाठी शौचासाठी बसणे इ. गोष्टी नेहमी टाळल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे आपण तलावाचे किंवा नदीचे पाणी पीत असू, तर असे पाणी आपण गाळून, उकळून पिणे गरजेचे असते.