संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध

माहीत आहे का तुम्हांला?

views

3:26
मुलांनो, काही वेळा खेड्यातील घरात जर कोणी आजारी पडले तर वयस्क माणसे म्हणतात अंगारा लावा, कोणत्या देवाचा नारळ द्यायचा राहिला आहे का?, कारण पूर्वीच्या लोकांची अशी समजूत होती की रोगबाधा ही देवाचा कोप, भूतबाधा, जादूटोणा यांमुळे होते. त्यांना रोगजंतू किंवा रोगबाधेची इतर कारणे माहीत नव्हती. त्यामुळे आजारांपेक्षा त्यावरील उपायच महाभयंकर असत. पुढे मानवाने अनेक बाबतीत संशोधन केले. त्यात त्यांनी सूक्ष्मजीवांचाही शोध लावला. म्हणजे आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. त्यातील काही सूक्ष्मजीवांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात. तर काही सूक्ष्मजीव मानवासाठी उपयुक्त असतात. उदा: दुधापासून दही बनविण्याची क्रिया ही सूक्ष्मजीवांमुळेच होते. तसेच आंबोळी, इडली-डोशासाठी आपण जे पीठ भिजवतो ते पीठ सूक्ष्मजीवांमुळेच आंबते. अशाप्रकारे काही सूक्ष्मजीव आपल्या फायद्याचेही असतात. मुलांनो, आपण या पाठातून पुढील गोष्टी शिकलो: १. सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात. २. रोग होण्यास जे सूक्ष्मजीव कारणीभूत ठरतात, त्या सूक्ष्मजीवांना रोगजंतू असे म्हणतात. ३. प्रत्येक रोगाचा एक विशिष्ट रोगजंतू असतो. ४. पाण्यावाटे, अन्नावाटे, हवेतून, थेट संपर्कामुळे तसेच कीटक चावल्यामुळे रोगजंतूंचा प्रसार होतो.