संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध

रोग प्रतिबंध

views

3:51
रोग प्रतिबंध: रोग होऊ नये म्हणून केलेल्या उपायांना रोगप्रतिबंध असे म्हणतात. अनेक प्रकारचे रोग होण्यापूर्वी ते होऊ नयेत म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. त्यातून रोगाची लागण किंवा प्रसार टाळता येतो. रोगप्रतिबंध अनेक मार्गांनी केला जाते. पाण्यामार्फत होणारा रोगप्रसार टाळण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. म्हणजे पाण्यातील जंतू विविध पद्धतींचा वापर करून नष्ट केले जातात. गावांतील पाण्याच्या सार्वजनिक स्त्रोतांचे म्हणजे तलाव, विहीर यांचे ब्लिचिंग पावडरचा वापर करून निर्जंतुकीकरण केले जाते. गॅस्ट्रो किंवा कावीळ यासारख्या रोगांचा प्रसार पाण्यातून होत असतो. अशा रोगांची साथ पसरली, की पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला जातो. पाणी उकळल्यामुळे त्यातील रोगजंतू मरतात. त्यामुळे त्यांचा आपल्या शरीराला असलेला धोका टळतो.