संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध

लसीकरण

views

4:29
मुलांनो, एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा प्रत्येकालाच तो रोग होतो का? तर नाही होत. काही लोकांनाच त्या रोगाची लागण होते. परिसरातील सर्वच लोकांना त्या रोगाची लागण झाली आहे असे होत नाही. याचे कारण म्हणजे ज्या लोकांना रोगाची लागण होत नाही, अशा लोकांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. शरीरात रोगजंतू शिरतात, तेव्हा आपले शरीर त्या जंतूंविरुद्ध लढा देते. त्या जंतूंना शरीरात पसरू देत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा शरीरात रोगजंतूंना शिरल्यावरही रोग होत नाही. कारण त्या रोगजंतुना लढा देण्यासाठी आपले शरीर सक्षम असते. रोगप्रतिबंधाचा महत्त्वाचा उपाय म्हणजे लसीकरण होय. लसीकरणामुळे शरीरात विशिष्ट रोगांविरुद्ध लढण्याची रोगप्रतिकारक्षमता विकसित होते. घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात या रोगांसाठीची प्रतिबंधक लस एकत्र बनवलेली असल्याने ती त्रिगुणी या नावाने ओळखली जाते. त्रिगुणी लस ही बाळाच्या शरीरात टोचली जाते, तर पोलिओ प्रतिबंधक लस ही तोंडावाटे बाळाला दिली जाते. अशा विविध प्रकारांचा वापर करून रोगप्रतिबंध केला जातो. सार्वजनिक आरोग्य सेवासुविधा: साथीच्या आणि संसर्गजन्य रोगांस आळा बसावा, त्यांचा प्रसार थांबावा म्हणून राष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणि समाजकल्याण कार्यक्रम हाती घेतले जातात. उदा: पोलिओचे लसीकरण हे संपूर्ण देशात राष्ट्रीय स्तरावर राबविले जाते. सामुदायिक लसीकरणाचे विविध कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य योजनेखाली राबविण्यात येतात. बालकांना तज्ञ लोकांकडून लस टोचण्याची व्यवस्था केली जाते. यासाठी खास शिबिरांचे आयोजन करण्यात येते.