संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध

कीटकांमार्फत रोगप्रसार

views

4:38
कीटकांमार्फत रोगप्रसार: रोगांचा प्रसार आणखी एका पद्धतीने होऊ शकतो. तो म्हणजे कीटकांमार्फत होणारा रोगप्रसार होय. यामध्ये प्रामुख्याने डास या कीटकाचा समावेश होतो. विशिष्ट प्रकारचा डास चावल्याने हिवतापाची म्हणजेच मलेरियाची लागण होते, हे तुम्हांला माहीत असेलच. हिवताप झालेल्या व्यक्तीस विशिष्ट डास चावला, की त्या व्यक्तीच्या रक्तातील हिवतापाचे जंतू डासाने शोषलेल्या रक्ताबरोबर डासाच्या शरीरात असतात. संपर्कामुळे रोगप्रसार: काही वेळा रोग्याच्या संपर्कात आल्याने रोगाची लागण होत असते. त्यामध्ये नायटा, खरुज या रोगांचा समावेश होत असतो. नायटा, खरुज हे आपल्या शरीरावर म्हणजे त्वचेवर होणारे रोग आहेत. तर अशा प्रकारे हवेमार्फत, पाण्यामार्फत, अन्नपदार्थांमार्फत, कीटकांमार्फत आणि संपर्कामुळे रोगांचा प्रसार होतो हे तुमच्या लक्षात आले असेल. रोगाची साथ: मुलांनो, अनेक रोगांच्या साथी येत असलेल्या आपण पाहतो. उदा: फ्ल्यू, डोळे येणे, कांजिण्या, गोवर यांसारख्या रोगाचे रोगजंतू हवेमार्फत परिसरात झपाट्याने पसरतात. संपूर्ण हवेत या रोगाचे रोगजंतू पसरल्यामुळे एकाच वेळी अनेक लोकांना हे रोग होऊ शकतात.