चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म

प्रस्तावना

views

4:10
आज आपण चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म या पाठाचा अभ्यास करणार आहोत. ज्या पदार्थांकडे लोखंड, निकेल, कोबाल्ट इत्यादींपासून बनवलेल्या वस्तू आकर्षल्या जातात, अशा पदार्थाला ‘चुंबक’ असे म्हणतात. चुंबक हा विविध आकारांचा असतो. तो उपयोगानुसार बनविला जातो. आजकाल अनेक यंत्रे, उपकरणे यांमध्ये चुंबकाचा वापर केला जातो. त्यास मानवनिर्मित चुंबक असे म्हणतात. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण पट्टी चुंबक, चकती चुंबक, नालाकृती चुंबक, वर्तुळाकार चुंबक, दंडगोलाकार चुंबक, तसेच लहान आकाराचे बटनाप्रमाणे दिसणारे चुंबक वापरतो. आपल्या घरामध्ये व परिसरात चुंबकाचा उपयोग कोठे व कसा होतो ते पाहू. विद्युत घंटेत, विद्युत चुंबकाच्या रूपाने, विद्युत पंख्यात, विद्युत चुंबक असतो. पाणी खेचण्याच्या पंपात चालित्र असते, त्यात विद्युत चुंबक असतो. इमारतीत असलेले उद्वाहन (लिफ्ट), तसेच जहाजांवर अवजड लोखंडी सामान चढवणारी क्रेन यातही विद्युत चुंबक वापरलेला असतो.