चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म

चुंबकीय क्षेत्र

views

4:08
आता आपण चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय ते समजून घेऊया. चुंबक आपल्या जवळच्या भागात काही अंतरापर्यंत आपला परिणाम दाखवतो. चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर, चुंबकीय बल कार्य करते त्या भागास चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. चुंबकाभोवतीचे चुंबकीय क्षेत्र बलरेषांनी दाखवता येते. चुंबकपट्टीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जाणाऱ्या अदृश्य रेषांना चुंबकीय बलरेषा असे म्हणतात. आता हे चुंबकीय क्षेत्र कसे तयार होते, तसेच चुंबकीय बलरेषा म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण एक प्रयोग करून पाहूया. सर्वप्रथम एक पट्टीचुंबक व काही टाचण्या घ्या. नंतर पट्टीचुंबक व टाचण्या एकमेकांना चिकटणार नाहीत अशा अंतरावर ठेवा. आता चुंबक हळू-हळू टाचण्यांजवळ घेऊन जा. पहा, चुंबक टाचण्यांपासून दूर असताना सुद्धा टाचण्या चुंबकाकडे आकर्षित होताना दिसत आहेत. यावरून असे लक्षात येते की, चुंबक काही अंतरावर सुद्धा परिणामकारक असतो. कारण तेथपर्यंत त्याचे कार्यक्षेत्र असते.