चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म

पृथ्वी : एक प्रचंड मोठा चुंबक

views

4:27
चुंबक पृथ्वीसारखा गोल आकाराचा देखील असतो. चुंबकाच्या शोधाच्या बाबतीत असे म्हटले जाते, की इ.स. पूर्व सुमारे ८०० ते ६०० या काळात मॅग्नेशिया या आशिया मायनर भागातील रहिवाशांना एक दगड सापडला. या दगडामध्ये लोखंडी पदार्थांना स्वत:कडे खेचण्याचा म्हणजे आकर्षित करून घेण्याचा गुणधर्म होता. यावरून आपल्या लक्षात येते की, मूळ रुपात चुंबक हा दगड आहे. मुक्तपणे टांगलेला चुंबक दक्षिणोत्तर दिशेतच स्थिर राहतो. विल्यम गिल्बर्ट या शास्त्रज्ञाने नैसर्गिक अवस्थेमध्ये खानिजरूपात आढळणारा चुंबकीय दगड घेतला. त्या दगडाला त्याने गोल आकार दिला. नंतर त्याने हा गोलाकार चुंबक मुक्तपणे फिरू शकेल अशा रीतीने टांगला. त्यानंतर त्या शास्त्रज्ञाने त्या गोलाकार चुंबकाजवळ पट्टीचुंबकाचा उत्तरध्रुव आणला, तेव्हा चुंबकीय गोलाचा दक्षिणध्रुव त्याच्याकडे आकर्षित झाला. तसेच टांगलेल्या चुंबकाचा उत्तरध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तरध्रुवाच्या दिशेने स्थिर झाला. हे निरीक्षण केल्यावर त्या शास्त्रज्ञाने असा अर्थ काढला की, पृथ्वीच्या भौगोलिक उत्तरध्रुवाजवळ कोणत्यातरी प्रचंड चुंबकाचा दक्षिणध्रुव आणि भौगोलिक दक्षिणध्रुवाजवळ त्या चुंबकाचा उत्तरध्रुव असायला हवा. यावरून विल्यम गिल्बर्ट याने असे अनुमान काढले की पृथ्वी हाच एक मोठा चुंबक आहे