चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म

चुंबकीय क्षेत्राची वेधनक्षमता

views

4:13
चुंबकीय क्षेत्र हे पुठ्ठ्यातून, पाण्यातून, प्लास्टिकच्या बाटलीतून आरपार जाऊ शकते. या गुणधर्माला चुंबकीय क्षेत्राची वेधनक्षमता असे म्हणतात. आपण चुंबकीय क्षेत्राची वेधनक्षमता समजण्यासाठी काही प्रयोग करूया. त्यासाठी लागणारे साहित्य: पुठ्ठा, टाचण्या, चुंबक, टेबल. सर्वप्रथम टाचण्या घेऊन त्या एका टेबलावर पसरवा. या टाचण्यांच्या थोड्या अंतरावर एक पुठ्ठा धरा. एक पट्टीचुंबक घेऊन तो पुठ्ठ्यावरती ठेवा. आता चुंबक पुठ्ठ्यावर हळुवारपणे इकडे तिकडे फिरवा आणि निरीक्षण करा. पहा, चुंबक पुठठ्याच्या वरती ज्या भागावर ठेवलेला असतो त्या भागाखाली टाचण्या चिकटलेल्या दिसत आहेत. आणि जसे जसे चुंबक पुठ्ठ्याच्या वरील भागात फिरवू त्या त्या भागाखाली टाचण्या चिकटत आहेत. आता हीच कृती अजून पुठ्ठ्याचे थर वाढवून पुन्हा करा. पाहिलंत, तुम्ही थर वाढवून जरी ही कृती केलीत तरीही टाचण्या पुठ्ठ्याकडे आकर्षित होत आहेत. पाण्यातून चुंबकीय क्षेत्र कसे आरपार जाते ते बघण्यासाठी एक प्रयोग करूया. एक प्लास्टिकची पाण्याची बाटली घ्या. ती बाटली पाण्याने भरा. नंतर बाटलीत भरलेल्या पाण्यात काही टाचण्या टाका. टाचण्या टाकून झाल्यावर एक पट्टीचुंबक त्या बाटली जवळ घेवून जा आणि निरीक्षण करा. चुंबक बाटलीच्या जवळ थोड्या अंतरावर हलवून पहा आणि नीट निरीक्षण करा. पहा. पट्टी चुंबक बाटलीजवळ जस जसा हलवला तस तशी बाटलीतील टाचण्यांची हालचाल झाली.