चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म

चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म

views

3:01
आता आपण चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म पाहणार आहोत. मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने बल रेषांची कल्पना मांडली. म्हणजेच त्याने चुंबकीय क्षेत्रात बलरेषांमुळे काय घडते हे सांगितले. एका पट्टीचुंबकाचा ‘N’ हा ध्रुव म्हणजे उत्तर ध्रुव तर दुसऱ्या चुंबकाचा ‘S’ ध्रुव म्हणजे दक्षिण ध्रुव एकमेकांकडे आकर्षित झालेला दिसतो आहे. तसेच बलरेषा देखील दाखवल्या आहेत. चुंबकीय बलरेषा ह्या उत्तरध्रुवाकडून(N) दक्षिणध्रुवाकडे(S) जाताना दाखविल्या आहेत. तर मुलांनो, चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म मायकेल फॅरेडेने कसे सांगितले आहेत ते आपण पाहू. 1) चुंबकीय बलरेषा या काल्पनिक जोडण्या असून फॅरेडेने चुंबकीय आकर्षण व प्रतिकर्षण यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांची संकल्पना मांडली. 2) आकृतीत दाखविल्याप्रमाणे दोन विजातीय ध्रुव म्हणजे ‘N ‘ व ‘S‘ ध्रुव आकर्षित होतात. तर दोन सजातीय ध्रुव म्हणजे ‘N‘ व ‘N‘ हे एकमेकांपासून दूर जातात. हे त्याने चुंबकीय बलरेषांनी दाखविले आहे. चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तरध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात. हा दक्षिण ध्रुव त्याच किंवा दुसऱ्या चुंबकाचाही असू शकतो. 3) तसेच चुंबकीय बलरेषा एखाद्या स्प्रिंग सारख्या ताणलेल्या अवस्थेत असतात. 4) चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात. 5) चुंबकीय रेषा एकमेकांना छेदत नाहीत.