चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म

चुंबकत्व

views

5:07
येथवर आपण चुंबकाची माहिती करून घेतली. आता आपण चुंबकत्व म्हणजे काय ते पाहणार आहोत. चुंबकत्व म्हणजे चुंबक एखादी वस्तू आकर्षून घेतो, त्यामुळेच किंवा चुंबकीय बलामुळे त्या वस्तूचे विस्थापन होते. कारखाने, कचरा, डेपो, बंदरे अशा ठिकाणी मोठ्या वस्तूंची हलवाहलव करावी लागते. त्यासाठी क्रेनमध्ये चुंबक वापरतात. चुंबकीय बलामुळे कार्य होते. यावरून चुंबकत्व ही एक प्रकारची ऊर्जा आहे, हे आपल्या लक्षात येते. आता आपण पाहूया चुंबकत्व कसे निर्माण होते व त्या निर्माण करणाच्या पद्धती कोणत्या? त्यासाठी आपण प्रयोग करून पाहूया. या प्रयोगासाठी लागणारे साहित्य आहे. एक पोलादी पट्टी, पट्टीचुबंक, लोखंडी कीस, दोरा इत्यादी. पट्टीचुंबक पोलादी पट्टीवर १५ ते २० वेळा घासल्यामुळे त्या पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण झाले. या निर्माण झालेल्या चुंबकत्वामुळे पोलादी पट्टीकडे लोखंडाचा कीस आकर्षिला गेला. चुंबकत्व निर्माण करण्याच्या या प्रक्रियेला एकस्पर्शी पद्धत म्हणतात. पण थोड्या वेळाने हा पोलादी पट्टीला चिकटलेला लोखंडाचा कीस खाली पडेल. कारण पोलादी पट्टीत चुंबकाच्या साहाय्याने निर्माण केलेले चुंबकत्व हे एकस्पर्शी पद्धतीचे असल्याने ते कमी क्षमतेचे व अल्पकालीन असते.