चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म

काही प्रश्नांची उत्तरे

views

4:20
शि: चुंबकीय बल म्हणजे काय? वि: चुंबकाच्या ध्रुवांमध्ये आकर्षण किंवा प्रतिकर्षणाचे जे बल असते. किंवा अचूम्बकीय पदार्थ चुंबकाकडे ज्या बलाने आकर्षिले जातात त्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात.शि: छान! चुंबकीय बल हे प्रत्यक्ष स्पर्श न करता कार्य करते. ते कसे? वि: बाई चुंबकीय बल हे चुंबकीय बलरेषांमुळे तयार होते. या रेषा चुंबकाच्या उत्तर ध्रुवांकडून दक्षिण ध्रुवांकडे असल्याने त्या चुंबकाच्या सभोवताली पसरलेल्या असतात. त्यामुळे चुंबकीय बल हे चुंबकापासून काही अंतरापर्यंत कार्य करू शकते. म्हणून ते प्रत्यक्ष स्पर्श न करताही कार्य करते. शि: बरोबर! गुरुत्वीय बल व चुंबकीय बल यांमध्ये काय फरक आहे? वि: बाई गुरुत्वीय बलात फक्त आकर्षण असते प्रतिकर्षण नसते. तसेच ज्या वस्तूला वस्तुमान आहे अशा कोणत्याही वस्तूंवर गुरुत्वीय बल क्रिया करते. पिकेलेले फळ झाडावरून खाली पडणे हे गुरुत्वीय बलाचे उदाहरण आहे. तर चुंबकीय बल हे सर्वच वस्तूंवर क्रिया करत नाही. ते चुंबक-चुंबक, किंवा चुंबक आणि चुंबकीय पदार्थ यांच्यामध्येच क्रिया करते. आकर्षण आणि प्रतिकर्षण या दोन्ही क्रिया चुंबकीय बलात घडतात. लोखंडी व पोलादी वस्तू चुंबकाकडे आकर्षित होणे हे चुंबकीय बलाचे उदाहरण आहे. शि: अगदी बरोबर!