स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व

चला जाणून घेऊया

views

4:48
राष्ट्रीय सभेने अनेक वेळा ब्रिटिश सरकारकडे केलेल्या मागण्यांकडे ब्रिटिश सरकार सतत दुर्लक्ष करत होते. त्यामुळे राष्ट्रीय सभेने ब्रिटिशांना धडा शिकविण्यासाठी युद्धात सहभागी न होता युद्धाच्या विरुद्ध प्रचार करण्याचे ठरवले. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सामुदायिक चळवळ न करता एकेका व्यक्तीने कायदा तोडावा म्हणजेच कायदेभंग करावा असा निर्णय घेण्यात आला. यालाच वैयक्तिक सत्याग्रह असे म्हणतात. आचार्य विनोबा भावे हे या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. तर पंडित जवाहरलाल नेहरू हे वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही होते. त्यांच्यानंतर सुमारे पंचवीस हजार सत्याग्रहींनी वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेऊन तुरूंगवास स्वीकारला.