स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व

प्रतिसरकारांची स्थापना

views

3:09
देशाच्या काही भागांत ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकांना मदत करणारी, लोकाभिमुख सरकारे स्थापन करण्यात आली. यालाच प्रतिसरकार असे म्हणतात. ग्रामीण भागांत मोठया प्रमाणावर प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्हयांत प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रातील सातारा जिल्हयात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी १९४२ साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रतिसरकार स्थापन केले. म्हणजे पूर्वी जे ब्रिटिश सरकार कारभार पाहत होते, त्यांच्या हातातील कारभार त्यांनी स्वत:च्या हातात घेऊन त्या भागापुरती ब्रिटिश सत्ता संपुष्टात आणली. सांगली जिल्ह्यातील कुंडल येथील क्रांतिअग्रणी जी.डी. ऊर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखालील स्थापन झालेल्या तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन-शिक्षा करणे यासारखी कामे प्रतिसरकारमार्फत केली जात असत. प्रतिसरकारमधील नेमलेल्या लोकन्यायालयाद्वारे केलेला न्यायनिवाडा, दिलेला निर्णय लोक स्वीकारत असत. मुलांनो, पूर्वी सावकारांकडून सामान्य, गरीब लोकांचे खूप शोषण होत असे. अशा सावकारशाहीला या सरकारने विरोध केला. आपल्या प्रदेशात दारूबंदी, साक्षरता प्रसार, जातिभेद निमूर्लन अशी अनेक चांगली कामे या सरकारने केली. त्यामुळे आपल्या चांगल्याचा विचार करणारे कोणी तरी आहे, असा जनतेत विश्वास निर्माण झाल्यामुळे प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले