स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व Go Back आझाद हिंद सेनेचा पराक्रम views 2:57 १९४३-४४ या काळात जपानच्या सहकार्याने आझाद हिंद फौजेने ब्रिटिश फौजांशी अनेक ठिकाणी लढाया केल्या व प्रदेश जिंकून आपल्या ताब्यात घेतले. नोव्हेंबर, १९४३ मध्ये जपानने अंदमान व निकोबार ही बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या ताब्यात दिली. नेताजींनी अंदमानला ‘शहीद’ व निकोबारला ‘स्वराज्य’ अशी नावे दिली. १९४४ मध्ये आझाद हिंद सेनने म्यानमारमधील आराकानचा प्रदेश मिळविला. आसामच्या पूर्व सीमेवरील ब्रिटीशांची ठाणी जिंकली. याच काळात आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाली. त्यामुळे जून, १९४४ पासून आझाद हिंद सेनेच्या फौजांची माघार सुरू झाली. त्यामुळे इम्फाळ जिंकण्याची मोहीम मध्येच सोडावी लागली. मुलांनो, आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांविरुद्ध नेटाने, धैर्याने दिलेला लढा हा महत्त्वपूर्ण होता. प्रस्तावना क्रिप्स योजना छोडो भारत चळवळ चला जाणून घेऊया प्रतिसरकारांची स्थापना आझाद हिंद सेना आझाद हिंद सेनेचा पराक्रम भारतीय नौदल व विमान दलातील उठाव