स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व

आझाद हिंद सेना

views

3:50
भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी वेगळ्या मार्गाने प्रयत्न केले. भारताच्या पूर्व सीमेवर हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांविरुद्ध उभे राहिले. हे सैनिक आझाद हिंद सेनेचे होते. त्यांचे नेते होते नेताजी सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांमधील एक होते. त्यांनी दोनदा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषविले होते. सुभाषचंद्र बोस यांना असे वाटत होते, की इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतलेले आहे, त्याचा फायदा घेऊन भारतात स्वातंत्र्य प्राप्तीसाठीचे आंदोलन तीव्र करावे. त्यासाठी इंग्रजांच्या शत्रूचीही-म्हणजे जपानचीही-मदत घ्यावी. परंतु नेताजींचे हे मत राष्ट्रीय सभेच्या ज्येष्ठ नेत्यांना पटले नाही. त्यामुळे त्यांच्यात मतभेद झाले. परिणामी सुभाषबाबूंनी राष्ट्रीय सभेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ हा पक्ष स्थापन केला.