समतेचा लढा Go Back स्त्रियांची चळवळ views 4:18 भारतीय समाजव्यवस्था ही पुरुषप्रधान होती. समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते. पडदा पद्धत, सतीची चाल, हुंडा पद्धत, बालविवाह यांसारख्या अनेक वाईट चालीरीती व परंपरांमुळे त्यांच्यावर अन्याय होत असे. आधुनिक युगात याविरुद्ध जागृती होऊ लागली. स्त्रियांची स्थिती सुधारली पाहिजे, त्यांनाही मानाने, सन्मानाने जगता यावे, असे काही पुरुष सुधारकांना वाटत होते. त्यामुळे स्त्री-विषयक सुधारणा चळवळीत काही पुरुष सुधारकांनी पुढाकार घेतला. उदा: राजा राममोहन रॉय, गोपाळ हरि देशमुख (लोकहितवादी), महात्मा फुले, महादेव गोविंद रानडे, गो.ग आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे यांसारख्या सुधारकांनी स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केले. स्त्रियांच्या सुधारणांसाठी नंतरच्या काळात स्त्रियांचे नेतृत्वही पुढे येऊ लागले. त्यासाठी स्वतंत्र संस्था-संघटनाही स्थापन होऊ लागल्या. त्यांच्या माध्यमांतून स्त्रियांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयन होऊ लागला. उदा: पंडिता रमाबाईंनी ‘आर्य महिला समाजा’ ची स्थापना १८८२ मध्ये केली. तसेच मार्च १८८९ रोजी दोन विद्यार्थिनींना घेऊन शारदा सदन शाळा सुरू केली. तर रमाबाई रानडे यांनी १९०८ मध्ये सेवासदनची स्थापना केली. भारतीय महिलांनी सुरू केलेल्या या संस्था स्थानिक स्वरूपाच्या म्हणजे त्या-त्या प्रदेशांपुरत्या काम करणाऱ्या होत्या. परंतु पुढे भारत महिला परिषद (१९०४), ‘ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स’ (१९२७) या संस्थांचीही स्थापना झाली. प्रस्तावना कामगार संघटन समाजवादी चळवळ स्त्रियांची चळवळ दलित चळवळ राजश्री शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर