समतेचा लढा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

views

5:09
आपण अशा व्यक्तीचे कार्य पाहणार आहोत जिने आपले संपूर्ण आयुष्य अस्पृश्य व्यक्तींच्या उद्धारासाठी व सेवेसाठी अर्पण केले. त्या महान व्यक्तीचे नाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर. आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू (मध्यप्रदेश) येथे झाला. ते कोलंबिया, लंडन यांसारख्या विद्यापीठांत अनेक विषयांतील पदव्या घेऊन भारतात आले होते. त्यांनी इतर देशांतील समाजव्यवस्था आणि भारतातील समाजव्यवस्था यांचे अगदी जवळून निरीक्षण केले होते. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वांचे महत्त्व पटले होते. त्यामुळे आपल्या देशातील समाजाची उभारणीही स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वांवर व्हावी हे आंबेडकरांचे ध्येय होते. जातिसंस्था समूळ नष्ट झाल्याशिवाय दालितांवरील अन्यायाचा व विषमतेचा शेवट होणार नाही, अशी त्यांना खात्री होती. समाजात सर्व जाती, धर्मातील व्यक्तींना समान वागणूक मिळाली पाहिजे. तसेच सामाजिक समता हा दलितांचा हक्क आहे अशी त्यांची धारणा होती. त्यांनी २० जुलै १९२४ रोजी ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ स्थापना केली. त्यांनी आपल्या समाजबांधवांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा स्फूर्तिदायक संदेश दिला.