समतेचा लढा

राजश्री शाहू महाराज

views

4:15
कोल्हापूर संस्थानाचे राजे राजश्री शाहू महाराज यांच्यावर महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव पडला होता. त्यांनी दलितांचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पाठराखण केली. आंबेडकरांच्या काळात निर्माण झालेल्या ब्राह्मणेतर म्हणजे ब्राह्मण सोडून इतर जातींच्या लोकांच्या चळवळीचे नेतृत्व केले. राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. त्यांनी आपल्या संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला. कोल्हापूर संस्थानामध्ये इ.स १९०२ साली सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गासाठी ५०% जागा राखून ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सर्व जाती, धर्माच्या व्यक्तींना प्राथमिक शिक्षण घेता यावे, म्हणून मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा त्यांनी केला. त्यांनी समाजातील जाति-भेद नष्ट व्हावा यासाठी खूप मोलाचे कार्य केले. त्याकाळी जातिव्यवस्थेत 1)रोटी बंदी 2)बेटी बंदी 3)व्यवसाय बंदी असे तीन निर्बंध होते. रोटीबंदी म्हणजे अस्पृश्य किंवा दलितांच्या हातचे पाणी, अन्न व इतर गोष्टी इतर उच्च वर्गातील लोकांना चालत नसे. याला विरोध म्हणून शाहू महाराज सभा, परिषदांमधून दलित लोकांच्या हातचे अन्न घेऊन खात. तर बेटीबंदी म्हणजे एका जातीतील व्यक्तीचा विवाह त्याच जातीतील व्यक्तीबरोबर केला जात असे. अन्य जातींतील व्यक्तीबरोबर विवाह करण्यास मनाई होती. शाहू महाराजांची अशी धारणा होती की बेटीबंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे, तोपर्यंत जातिभेद समूळ नष्ट होणार नाही.