प्रकाशाचे परिणाम

थोडे आठवा

views

3:11
आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ‘प्रकाश’ खूप आवश्यक आहे. प्रकाश नसेल तर सर्व सजीवांचे जीवन अंधकारमय होईल. सूर्य, तारे, बल्ब यांपासून आपल्याला प्रकाश मिळतो. जर प्रकाश नसेल तर सगळीकडे अंधार होईल. आपल्याला आपल्या सभोवतालच्या वस्तू दिसणार नाहीत. तसेच वनस्पतीसुद्धा जिवंत राहणार नाहीत. कारण सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती अन्न तयार करत असतात. तसेच सूर्यप्रकाश मानवालाही खूप फायद्याचा ठरतो. कारण कोवळ्या सूर्यप्रकाशातून ‘डी’ जीवनसत्त्व मिळत असते. अशाप्रकारे प्रकाशाचे सर्व सजीवांच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. प्रकाशाचा सजीवांच्या जीवनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो. त्याचाच अभ्यास आपण या पाठात करणार आहोत.