प्रकाशाचे परिणाम

बिंदूस्रोत व विस्तारित स्रोतामुळे मिळणारी छाया

views

2:45
आपण प्रकाशाच्या विकीरणाची माहिती अभ्यासली आहे. आता आपण प्रकाशाचे हे किरण आदळून ‘छाया’ म्हणजेच सावली कशी पडते. त्याची माहिती अभ्यासुया. छाया म्हणजेच सर्वसामान्यपणे आपण सावली असे म्हणतो. म्हणजेच प्रकाश स्त्रोतातून निघालेला प्रकाश त्यासमोर ठेवलेल्या पडद्याला उजळून टाकतो. परंतु त्याचवेळेस त्या प्रकाशस्त्रोतासमोर एखादी वस्तू ठेवली तर या वस्तूमुळे प्रकाशाचा काही भाग अडवला जातो. हा भाग आपल्याला काळा दिसतो याला आपण ‘छाया’ असे म्हणतो. याच छायेविषयी आपण आणखी माहिती विस्ताराने अभ्यासुया. सर्वप्रथम आपण बिंदूस्त्रोत व विस्तारित स्त्रोतामुळे मिळणारी छाया यांची माहिती पाहू. त्यासाठी आपण एक प्रयोग करू प्रथम एक पेटती मेणबत्ती किंवा विजेरी म्हणजेच टॉर्च यापैकी एक प्रकाशस्त्रोत घ्या. नंतर पुठ्ठा घेऊन पुठ्ठयाला एक बारीक छिद्र पाडा. पहा, या बारीक छिद्रातून आपल्याला प्रकाश आलेला दिसतो. त्याला o हे नाव द्या. अशा स्रोताला बिंदूस्रोत असे म्हणतात. म्हणजेच जेव्हा प्रकाश्स्त्रोत हा सूक्ष्म म्हणजेच लहान आकाराचा असतो. त्यालाच बिंदूस्त्रोत असे म्हणतात.