प्रकाशाचे परिणाम

प्रकाशाचे विकिरण

views

3:11
प्रकाश म्हणजे ‘उजेड’. तर हा प्रकाश कसा पसरतो ? हा प्रश्न आपल्याला पडतो. त्यापूर्वी आपण विकिरण म्हणजे काय ते पाहूया. विकिरण: विकिरण म्हणजे ‘विखुरणे’ किंवा वेगवेगळे होणे. प्रकाशकिरण हा अनेक रंगाचा बनलेला असतो. तर विकिरण म्हणजे किरणातील घटक वेगळे होणे किंवा विखुरणे, पसरणे असे आपण म्हणू शकतो. प्रकाशकिरण हे स्थायू, द्रव, वायू यांच्या सूक्ष्मकणांवर आदळले की प्रकाशकिरणातील घटक वेगळे होतात. किंवा विखुरले जातात. याठिकाणी ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे काचेचे एक चंचूपात्र घ्या. या चंचूपात्रामध्ये स्वच्छ पाणी टाका. आता या पाण्यावर लेझर पॉंईंटरने लेझर किरण सोडा. पाण्यात मिसळलेल्या सूक्ष्मकणांवर किरणे आदळतात व प्रकाशझोत आपल्याला दिसतो. जसा सूर्य उगवल्यानंतर आपल्याला सर्वत्र प्रकाश दिसून येतो. हा प्रकाश आपल्याला हवेतील धुलीकण, रेणू, काही सूक्ष्मकण यांच्यामुळे दिसतो. म्हणजेच सूर्यप्रकाशाचे हवेतील विविध घटकांच्या सूक्ष्मकणांमुळे झालेले विकिरण होय. “वातावरणातील रेणू धुलीकण व इतर सूक्ष्म कणांवर प्रकाशाचे किरण आदळतात व सर्वत्र विखुरले जातात. यालाच प्रकाशाचे विकिरण असे म्हणतात.” याचाच अर्थ आपण असे म्हणू शकतो की, जर वातावरणामध्ये हे धुलीकण किंवा सूक्ष्मकण नसते तर आकाश दिवसासुद्धा काळे दिसले असते. म्हणजेच सूर्य आपल्याला थेट स्पष्टपणे दिसला असता. तसेच सूर्याच्या प्रकाशाचा आपल्याला खूप त्रास झाला असता. पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जाणाऱ्या अग्निबाण व उपग्रहावरून केलेल्या निरीक्षणावरून हे स्पष्ट झालेले आहे.