प्रकाशाचे परिणाम

प्रयोग

views

3:30
आता आपण प्रकाशाच्या विकीरणाचा आणखी एक प्रयोग करू. यासाठी लागणारे साहित्य आहे: 60 किंवा 100 वॅट असलेला दुधी बल्ब म्हणजे पांढरा प्रकाश पडेल असा बल्ब, तसेच एक टेबल लँप, जाड काळा कागद, चिकटपट्टी, दाभण 100 किंवा 200 मिलीलीटरचे काचेचे चंचूपात्र, दूध किंवा दूधपावडर, ड्रॉपर किंवा चमचा कृती: टेबल लँपच्या शेडचे तोंड काळा कागद चिकटपट्टीने चिकटवून व्यवस्थित बंद करा. कागदाला बरोबर मध्यभागी एक ते दोन मिमी. व्यास असलेले छिद्र पाडा. तसेच चंचूपात्रात स्वच्छ पाणी घ्या. दिवा चालू करा व आकृतीत दाखवल्याप्रमाणे छिद्राला लागून चंचूपात्र ठेवा. चंचूपात्राच्या समोरून 90० कोनातून चंचूपात्राचे बारकाईने निरीक्षण करा. या निरीक्षणानंतर चंचूपात्राच्या पाण्यामध्ये ड्रॉपरच्या मदतीने दुधाचे 2 ते 4 थेंब टाका व दुधाचे थेंब व चंचूपात्रातील पाणी याच्या एकत्रित मिश्रणाला चमच्याने ढवळा. पाणी गढूळ होण्यासाठी दुधाचे थेंब जास्त टाकले तरी चालतात.