प्रकाशाचे परिणाम

विस्तारित प्रकाशस्त्रोत

views

3:53
आपण बिंदूस्त्रोतापासून प्रच्छाया कशी मिळते याची माहिती अभ्यासली आहे. आता आपण विस्तारित स्त्रोताविषयी माहिती अभ्यासुया. विस्तारीत स्त्रोतामुळे छायेचे फिकट व गडद असे दोन भाग पडद्यावर दिसतात. जो भाग फिकट (BC) असतो त्याला उपछाया असे म्हणतात. तर जो भाग गडद (AD) असतो त्या भागाला प्रच्छाया असे म्हणतात. आता पुढील कृतीत विस्तारित स्त्रोतापेक्षा चेंडू मोठा असल्यास काय होते ते पाहू? यासाठी विस्तारीत स्त्रोत म्हणजेच विजेरी व चेंडू यांच्यातील अंतर कायम ठेवून पडदा त्यांच्या पासून दूर- दूर सरकवा. पडदा जसा – जसा दूर जातो तसतशी पडद्यावरील उपछाया व प्रच्छाया मोठी – मोठी होत जाते. म्हणजेच या आकृतीवरून आपल्याला असे म्हणता येईल की, जेव्हा प्रकाशझोत मोठया आकाराचा असतो तेव्हा त्याला ‘विस्तारीत स्त्रोत’ असे म्हणतात. विस्तारीत स्त्रोतापासून निघणाऱ्या प्रकाशाच्या मार्गात वस्तू ठेवली तर पडद्यावर दोन छाया मिळतात. त्यातील गडद छायेला ‘प्रच्छाया’ असे म्हणतात. व फिकट छायेला ‘उपछाया’ असे म्हणतात.