प्रकाशाचे परिणाम

पिधान

views

3:09
आता आपण ‘पिधान’ या स्थितीविषयी माहिती पाहूया. पृथ्वीवरून पाहता जेव्हा एखादा ग्रह किंवा तारा चंद्राच्या मागे जातो तेव्हा त्या घटनेस ‘पिधान’ असे म्हणतात. सूर्य, चंद्र किंवा अन्य एखाद्या ताऱ्याच्या बाबतीत पिधान स्थितीविषयी घडणारी घटना सर्वसामान्य घटना आहे. 2016 या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये चंद्राच्या मागे रोहिणी हा तारा झाकला गेला होता. त्यामुळे तेव्हा ‘पिधान’ स्थिती निर्माण झाली होती. शून्यछाया दिन: ‘ज्या दिवशी सूर्य बरोबर अचूक आपल्या माथ्यावर येतो तेव्हा त्या दिवसाला ‘शून्यछाया दिन’ असे म्हणतात. या दिवसाच्या मध्यान्ही म्हणजेच दिवस मधोमध आल्यानंतर ही घटना घडते. शून्यछाया दिनाच्या दिवशी हात – पाय न पसरता सरळ उभे राहिले तर आपल्या शरीराची सावली थेट आपल्या पायाच्या तळव्याच्या तळाखाली पडते. म्हणजेच आपल्या शरीराची सावली आपल्यालाच दिसत नाही. परंतु आपण हात बाजूला केला तर आपल्या हाताची सावली आपल्याला दिसते. ही घटना कर्कवृत्त (23.5०) व मकरवृत्त (23.5०) यांदरम्यान असलेल्या प्रदेशात पहायला मिळते. परंतु याच प्रदेशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही घटना उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या दिवशी घडत असते. सूर्यमालेमध्ये घडणाऱ्या ग्रहाविषयीच्या घटना ह्या नैसर्गिकरित्या घडत असतात. परंतु ग्रहणाबाबत अनेक अंधश्रद्धा आपल्या समाजामध्ये आहेत. सर्वांनी मिळून समाजातील, या अंधश्रद्धा दूर करायला पाहिजेत. ’21 सप्टेंबर’ हा दिवस आपण जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस म्हणून साजरा करत असतो.