समरूपता Go Back उदाहरण 3 (समान क्षेत्रफळांच्या त्रिकोणांच्या दोन जोडया) views 2:58 उदा:3 ABCD हा समांतरभूज चौकोन आहे. P हा बाजू BC वरील कोणताही एक बिंदू आहे. तर समान क्षेत्रफळांच्या त्रिकोणांच्या दोन जोडया शोधा. (पान क्र. 4, आकृती 1.11) उकल: ABCD हा समांतरभूज चौकोन आहे. ∴ AD ll (समांतर) BC व AB ll DC आहे. आता आपण ∆ABC व ∆BDC चा विचार करूया. कारण हे दोन्ही त्रिकोण दोन समांतर रेषेमध्ये काढले आहेत. त्यामुळे समांतर रेषांमधील अंतरही त्या दोन्ही त्रिकोणाची उंची होईल. ∆ABC व ∆BDC च्या दोन त्रिकोणाचा पाया BC हा समान आहे. व उंचीही समान आहे. म्हणून A(∆ABC)= A(∆BDC) आहे. कारण हे समान उंची व पायाचे त्रिकोण आहेत. आता A(∆ABC)= A(∆ABD) या दोन त्रिकोणात AB हा पाया समान आहे व उंचीही समान आहे ∴A(∆ABC)= A(∆ABD) आहे. कारण हे समान पाया व उंचीचे त्रिकोण आहेत. प्रस्तावना कृती 1 उदाहरण 3 (समान क्षेत्रफळांच्या त्रिकोणांच्या दोन जोडया) प्रमाणाचे मुलभूत प्रमेय त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोटया व त्यांचे गुणधर्म समरूप त्रिकोणांची को-को (कोन-कोन) कसोटी: उदाहरण 3 (सर्व कसोटयांवर आधारित उदाहरणे) समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय