समरूपता

समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय

views

5:01
प्रमेय: जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भूजांच्या वर्गाच्या गुणोत्तराएवढे असते. आता या प्रमेयावर आधारित उदाहरणे आपण सोडवूया. उदा:1) ∆ABC ~ ∆PQR, A(∆ABC)=16,A(∆PQR)=25 तर AB/PQ या गुणोत्तराची किंमत काढूया. उदा:2) दोन समरूप त्रिकोणाच्या संगत भूजांचे गुणोत्तर 2:5 आहे. लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 64 चौ.सेमी असेल तर मोठया त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? उदा:3) समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB ll बाजू CD आहे. कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना P बिंदूत छेदतात. अशाप्रकारे आपण या पाठात काही प्रमेय तर काही कसोटया व त्यावर आधारित उदाहरणे कशी सोडवायची याचा अभ्यास केला आहे.