समरूपता

त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोटया व त्यांचे गुणधर्म

views

3:15
दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांच्या तिन्ही संगत बाजू प्रमाणात असणे आवश्यक असते. परंतु या सहा अटींपैकी तीन विशिष्ट अटीची पूर्तता झाल्यास उरलेल्या अटींची पूर्तता आपोआप होते. म्हणजे दोन त्रिकोण समरूप होण्यासाठी तीनच विशिष्ट अटी पुरेशा असतात. या तीन अटी तपासून दोन त्रिकोण समरूप आहेत का ते ठरविता येते. अशा विशिष्ट अटींचा समूह म्हणजे समरुपतेच्या कसोटया होत. मागील इयत्तांमध्ये आपण विशिष्ट कसोट्यांचा अभ्यास केला आहे. त्यातील काही कसोटया व नवीन कसोट्यांचा अभ्यास आता आपण करणार आहोत. प्रथम समरूपतेची को-को-को कसोटी पाहूया. को-को-को (कोन-कोन-कोन) कसोटी: दिलेल्या त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार होणारे संगत कोन जर एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात.