समरूपता

त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय

views

5:27
प्रमेय: त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. पक्ष: ∆ABC च्या ∠C चा दुभाजक रेख AB ला E बिंदूत छेदतो. तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. प्रमेय: तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तराएवढे असते. आतापर्यंत झालेल्या सर्व प्रमेयांवर आधारित आपण काही उदाहरणे सोडवूया. उदा.1) ∆ABC मध्ये DE ll BC आहे. जर DB= 5.4cm, AD = 1.8 सेमी, EC= 7.2 सेमी आहे तर AE काढा. 2) ∆PQR मध्ये रेख RS हा ∠R चा दुभाजक आहे जर PR=1.5, RQ= 20, PS= 12 तर SQ काढा.