उष्णता

प्रस्तावना

views

3:16
उष्णतेची जाणीव ही स्पर्शाने होते. उष्णतेमुळे पदार्थात होणाऱ्या रंगातील व आकारातील फेरबदलांमुळे तिच्या उष्णतेच्या तीव्रतेचा आपल्याला अंदाज करता येतो. मागील इयत्तेत आपण उष्णता व उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार यांविषयी माहिती घेतली होती. तसेच उष्णतेमुळे स्थायूपदार्थांचे, वायुंचे आणि द्रवपदार्थांचे आकुंचन कसे होते हे आपण वेगवेगळ्या प्रयोगाने करून पाहिले होते.आता आपण उष्णता व तापमान यांमध्ये काय फरक आहे ते समजून घेऊया. उष्णता हे ऊर्जेचे एक रूप आहे. पदार्थातील कणांत स्थितिज व गतिज ऊर्जा असते. पदार्थातील अणू सतत गतीशील असतात. त्यांच्या गतिज ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते. तर तापमान अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असते. दोन वस्तूंवरील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा समान असल्यास त्याचे तापमान समान असते.पदार्थातील सगळ्या कणांच्या एकूण ऊर्जेला औष्णिक ऊर्जा म्हणतात. दोन भिन्न तापमान असलेले पदार्थ औष्णिक संपर्कात आल्यास अधिक तापमानाच्या पदार्थांकडून कमी तापमानाच्या पदार्थांकडे औष्णिक ऊर्जेचे स्थलांतर होते. या स्थलांतर होत असलेल्या औष्णिक ऊर्जेला 'उष्णता' म्हणतात. पदार्थ किती उष्ण आणि थंड आहे हे व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या राशीला 'तापमान' म्हणतात.