उष्णता

होपचे उपकरण

views

3:35
पाण्याचे असंगत आचरण होप उपकरणाच्या साहाय्याने दाखविता येते. तर आता आपण या उपकरणाच्या साहाय्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करूया. होपच्या उपकरणात धातूच्या उभ्या नळकांड्यास मध्यभागी एक पसरट गोलाकार भांडे जोडलेले असते. या आकृतीत दाखविल्याप्रमाणे उभट नळकांड्यास पसरट भांड्याच्या वर T2 तापमापी जोडलेली असते. तर खाली T1 तापमापी जोडण्याची सुविधा केलेली असते. या उपकरणाच्या उभट नळकांड्यात पाणी भरले जाते. तर पसरट भांडयात बर्फ व मीठ यांचे गोठण मिश्रण भरतात. जेव्हा आपण होपच्या उपकरणाच्या साहाय्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करतो, तेव्हा प्रत्येकी 30 सेकंदानंतर T1 व T2 तापमापीने दाखविलेल्या तापमानाची नोंदणी करावी लागते.