उष्णता

करून पाहूया

views

5:45
अप्रकट उष्मा - स्थायू पदार्थास उष्णता दिल्यास सुरुवातीचे त्याचे तापमान वाढते. यावेळी पदार्थाने शोषलेली उष्णता पदार्थाच्या कणांची म्हणजेच अणू व रेणूंची गतिज ऊर्जा वाढवण्यात तसेच त्या कणांमधील आकर्षण बलांविरुद्ध कार्य करण्यात वापरली जाते. येथे पदार्थ म्हणजे बर्फ होय. पदार्थाला उष्णता देणे सुरु ठेवल्यास ठराविक तापमानाला स्थायू पदार्थाचे द्रवात रूपांतर होऊ लागते, यावेळी तापमान स्थिर राहते. पदार्थाने शोषलेली उष्णता पदार्थातील कणांमधील बंध तोडण्यासाठी व अवस्थांतरासाठी वापरली जाते. या उष्णतेस वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणतात. तसेच एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते, त्या उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणतात. ज्या स्थिर तापमानाला द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होते त्या तापमानाला द्रवाचा उत्कलनांक म्हणतात. स्थिर तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेस बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असे म्हणतात.