उष्णता

दवबिंदू तापमान आणि आर्द्रता

views

5:21
पृथ्वीचा 71% पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे हे आपल्याला माहितच आहे. तलाव, नदया आणि सागर यांच्यातील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात पाण्याचे बाष्प असते. वातावरणात असणाऱ्या पाण्याच्या वाफेचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. म्हणजेच वातावरणातील हवेचे प्रमाण कमी-अधिक होते. तसेच वातावरणातील उष्णता कमी- अधिक जाणवते. वातावरणामध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचे स्वरूप समजण्यास मदत होते. हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा म्हणजे 'आर्द्रता' होय. एका दिलेल्या तापमानास दिलेल्या हवेच्या आकारमानात एका कमाल मर्यादेपर्यंत बाष्प सामावले जाते. या मर्यादेपेक्षा जास्त बाष्प असल्यास त्या अतिरिक्त बाष्पाचे पाण्यात रूपांतर होते. हवेमध्ये जेव्हा पाण्याची कमाल वाफ साठवलेली असते तेव्हा ती हवा त्या विशिष्ट तापमानास बाष्पाने संपृक्त आहे असे म्हणतात. हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प सामावलेले असल्यास ती हवा असंपृक्त हवा आहे असे म्हणतात.