उष्णता

सांगा पाहू

views

4:21
पदार्थ थंड आहे की उष्ण या संवेदनाचा आपल्या शरीर तापमानाशी काय संबध आहे? गरम केलेल्या पाण्याचा स्पर्श आपल्याला झाल्यास ते पाणी गरम आहे असे जाणवते. म्हणजेच ज्या पदार्थाचे तापमान आपल्या शरीर तापमानापेक्षा जास्त आहे अशा पदार्थाचा आपल्या शरीराला स्पर्श झाल्यास तो पदार्थ उष्ण आहे अशी संवेदना होते. तसेच ज्या पदार्थाचे तापमान आपल्या शरीर तापमानापेक्षा कमी आहे अशा पदार्थांचा शरीराला स्पर्श झाल्यास तो पदार्थ आपल्याला थंड जाणवतो. उदा. बर्फ.सर्वसाधारणपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व तो पदार्थ थंड केल्यास त्याचे आकुंचन होते. परंतु पाणी हे वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते. जसे की, 00Cतापमानाचे पाणी तापविले असता 40Cतापमान होईपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते. 40C ला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते. 40Cच्या पुढे तापमान वाढविल्यास पाण्याचे आकारमान आपल्याला वाढताना दिसते. 00C ते 40C या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास 'पाण्याचे असंगत आचरण' असे म्हणतात.