उद्योग Go Back प्रस्तावना views 4:19 उद्योगांचे वर्गीकरण चार प्रकारांत केले जाते. 1)प्राथमिक उद्योग 2)द्वितीयक उद्योग 3)तृतीयक उद्योग आणि 4)चतुर्थक उद्योग. कोणत्याही प्रदेशात उद्योगांची वाढ होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. उदा: कच्चा माल, पाणीपुरवठा, ऊर्जा, मजुरांचा पुरवठा, वाहतूक व्यवस्था, बाजारपेठ यांसारख्या घटकांचा मुबलक पुरवठा असणाऱ्या प्रदेशात उद्योगांची वाढ होते. आपण कच्चा माल जसाच्या तसा वापरू शकत नाही. उदा: ऊस या कच्च्या मालाचा वापर आपण साखरे ऐवजी जसाच्या तसा करू शकत नाही. म्हणजेच आपण चहामध्ये साखरेऐवजी ऊस वापरू शकत नाही. तसेच कापडाऐवजी आपण कापूस वापरू शकत नाही. म्हणून कच्च्या मालातून आवश्यक तो घटक घेऊन त्याला योग्य आकार व स्वरूप देऊन तो वापरण्यास सोयीचा करण्यासाठी कच्च्या मालाचे पक्क्या मालात रुपांतर करणे गरजेचे असते. अगदी बरोबर उत्तर दिलीत तुम्ही! या प्रश्नोत्तरांमधून तुमच्या लक्षात आले असेल, की उद्योग किती महत्त्वाचे असतात ते. प्रस्तावना उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक पहा बरे जमते का? जरा डोके चालवा जरा डोके चालवा औद्योगिक विकास सांगा पाहू! उद्योगांचे सामाजिक दायित्व औद्योगीकरण व पर्यावरण पहा बरे जमते का? जलसाक्षरता-काळाची गरज